पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याद्वारे धोनीचे पुनरागमन

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मागील काही काळापासून क्रिकेटपासून लांब आहे. 2019 च्या वर्ल्ड कपनंतर महेंद्र सिंह धोनी संघात परतेलेला नाही. गेली अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा देखील वाढल्या आहेत. मात्र कॅप्टन कूल लवकरच आपल्या क्रिकेटच्या मैदानात दिसणार आहे. मात्र धोनी क्रिकेट खेळताना नाही तर समालोचकाच्या भूमिकेत लवकरच आपल्याला दिसण्याची शक्यता आहे.

भारताचा पहिला दिवस-रात्र कसोटी सामना बांगलादेशविरूध्द ईडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात महेंद्र सिंह धोनी समालोचकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सामन्याचे ब्रॉडकास्टर स्टार धोनीला गेस्ट कॉमेंटेटर म्हणून सामन्या दरम्यान आणण्याची तयारी करत आहे.

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारताच्या पहिल्या दिवस-रात्र सामन्यादरम्यान भारताच्या सर्व माजी कर्णधारांनी उपस्थित राहून कसोटी सामन्याबद्दल आपल्या आठवणी सांगाव्या असा प्रस्ताव ठेवला आहे.

सामन्याच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी सर्व कर्धणार भारतीय संघाबरोबर मैदानावर देखील उपस्थित असतील. जर धोनीने हे निमंत्रण स्विकारले तर पहिल्यांदाच धोनी समालोचकाच्या भूमिकेत चाहत्यांना दिसेल.

भारत व बांगलादेशमधील दिवस-रात्र कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून कोलाकात्यामधील ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.

 

Leave a Comment