पुन्हा एकदा विवाहबद्ध झाला आफ्रिकेचा हा माजी क्रिकेटपटू


नवी दिल्ली – पुन्हा एकदा दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि फलंदाज ग्रॅहम स्मिथ लग्न केले आहे. आपली प्रेयसी रोमी लाफ्रान्चीशी स्मिथने लग्नगाठ बांधली आहे. काही महिन्यांपूर्वीच रोमीशी स्मिथने साखरपुडा केला होता.


रोमीसोबतचा आपल्या लग्नाचा फोटो स्मिथने शेअर केला. स्मिथने या फोटोच्या कॅप्शनमध्ये ‘२ नोव्हेंबर हा अविश्वसनीय दिवस होता!!’, असे म्हटले आहे. यापूर्वी आयरिश गायक मॉर्गन डीन हिच्यासोबत ऑगस्ट २०११ मध्ये स्मिथने लग्न केले होते. स्मिथ आणि मॉर्गन यांना दोन मुले आहेत. त्यांच्या नात्यात २०१५ मध्ये दुरावा आल्यामुळे या दोघांनी घटस्फोट घेतला होता.

स्मिथ दक्षिण आफ्रिकेचा सर्वात युवा कर्णधार म्हणून ओळखला जातो. २०१४ साली स्मिथने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्याने आफ्रिकेसाठी ११७ कसोटी सामन्यात ९२६५ धावा केल्या आहेत. यात २७ शतकांचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने १९७ सामने खेळत ६९८९ धावा केल्या, तर टी-२० क्रिकेटमध्ये ३३ सामने खेळताना ९८२ धावा केल्या आहेत.

Leave a Comment