2 वर्षांच्या मुलीसाठी ‘हा’ शब्द वापरल्याने कॅफेला मागावी लागली माफी

न्युझीलंडमधील एका कॅफेला दोन वर्षांच्या मुलीला भयानक म्हटल्याने माफी मागावी लागली आहे. किमबेर्ली सुझे यांच्याकडून ख्रिस्टचर्चे येथील कॅफे सुप्रीमने अधिक शुल्क तर घेतलेच मात्र बिलावर कॅफेने ‘कुटूंबासोबत एक भयानक लहान मूल’ असे लिहिले. कॅफेच्या या वागणुकीवर किमबेर्ली यांनी फेसबुकवर पोस्ट नाराजी व्यक्त केली.

https://www.facebook.com/photo.php?fbid=789816296078&set=a.516574395038&type=3

किमबेर्ली यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले की, कॅफेने दिलेली ही वागणूक अपमानकारक आहे. त्यांनी बिलावर कुटूंबासोबत एक भयानक लहान मूल असे तर लिहिलेच पण जाणून बुजून अधिक शुल्क आकारले.  त्यांनी पुढे लिहिले की, माझी मुलगी कॅफेमध्ये अगदी शांत व फ्रेंडली होती. तिने तेथे काहीही मस्ती केली नाही. जी लोक आज तेथे कामाला आहेत, तेच आधी तिला क्यूट आणि स्विट म्हणत असे.

त्यांनी लिहिले की, कॅफेने आपले नेहमीचे ग्राहक गमावले आहेत.

https://www.facebook.com/coffeesupremenz/photos/a.1547436055518055/2374136676181318/?type=3

या प्रकरणानंतर कॅफेने किमबेर्ली यांची माफी मागितले असून, त्यांचे पैसे देखील परत केले आहेत. याशिवाय कॅफेचे मॅनेजर टीम नॉरिस यांनी देखील त्यांची स्वतः माफी मागितली. तर बिलावर अशा पध्दतीने लिहिणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 1 आठवडा लहान मुले आणि त्यांच्या पालकांना फ्री कॉफी आणि चॉकलेट ड्रिंग्स देणार असल्याचे सांगितले.

Leave a Comment