या ठिकाणी मलायकाला अर्जुनशी बांधायची आहे लग्नगाठ


आता प्रसार माध्यमांसमोर अधिकृत रित्या अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा या दोघांनीही आपले नाते स्वीकारले आहे. मलायकाला अरबाज खानसोबत घटस्फोट झाल्यानंतर अर्जुनच्या रुपात नवे प्रेम मिळाले आहे. या दोघांच्या लग्नाच्या गेल्या काही काळापासून जोरदार चर्चा सुरु आहेत. त्यातच आता आपल्या ड्रीम वेडिंगविषयीचा खुलासा मलायकाने केला आहे.

मलायकाने अभिनेत्री नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये अर्जुनसोबतच्या ड्रीम वेडिंगविषयी अनेक गोष्टी सांगितल्याचे पाहायला मिळाले. तिने यावेळी समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. त्यासोबतच Elie Saab gown गाऊन तिला परिधान करायचे असल्याचेही ती म्हणाली.

View this post on Instagram

♥️

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on


मला समुद्रकिनारी लग्न करायचे आहे. त्याचबरोबर माझ्या ब्राइड्समेड माझी गर्लगँगच असतील. माझ्या लग्नाची थीमसुद्धा पांढरा रंगाची असेल. त्यामुळे आमच्या कपड्यांपासून ते डेकोरेशनपर्यंत सर्व गोष्टींमध्ये पांढऱ्या रंगाचा समावेश करण्यात येईल, असे मलायका म्हणाली. त्याचबरोबर मी अर्जुनचे चांगले फोटो काढत नाही, असे अर्जुनला वाटते. पण असे असले तरी तो एक उत्तम फोटोग्राफर असून तो माझे सुंदर फोटो काढतो.

दरम्यान, २०१७ साली मलायका आणि अरबाज खान यांनी घटस्फोट घेतला. हे दोघे १८ वर्षांच्या संसारानंतर विभक्त झाले. मलायका त्यानंतर अर्जुन कपूरला डेट करत आहे. हे दोघेही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत. येथील अनेक फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

Leave a Comment