अशाप्रकारे रेल्वे तिकीट बुक केल्यास होणार कारवाई

जर तुम्ही वारंवार रेल्वेचा प्रवास करत असाल आणि अशावेळी तिकीट बुक करायचे असेल तर खऱ्या ईमेल आणि मान्यता प्राप्त एजेंटद्वारेच तिकीट बुक करा. फेक ई-मेल आणि दलालांद्वारे तिकीट बुक केल्यास तिकीट ब्लॉक केले जाईल. तुम्हाला रेल्वेतून प्रवास करण्यास देईल मनाई करण्यात येईल. रेल्वे सुरक्षा दलाने 26 ऑक्टोंबर ते 4 नोव्हेंबर दरम्यान दलाल आणि फेक ईमेल आयडीद्वारे बुक करण्यात आलेली 2801 प्रवाशांची तिकीटे ब्लॉक केली आहेत.

रेल्वेने दलालांवर कारवाई करण्यासाठी तयारी केली आहे. आता रेल्वे दलालांवर 10 हजारांची ऐवजी 50 हजार रूपये दंड लावणार आहे. याशिवाय 6 महिने जेलची देखील यात तरतूद असेल.

रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरूण कुमार यांच्यानुसार, दलालांपासून वाचण्यासाठी केवळ ऑथराइज्ड एजेंटद्वारेच तिकीट बुक करा. जर प्रवाशांनी दलालांद्वारे तिकीट बुक केले तर तिकीट ब्लॉक केले जाईल. 18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात यासंबंधी बिलात संशोधन करण्याची शक्यता आहे.

Leave a Comment