ही व्यक्ती तब्बल 36 वर्षांपासून शेकडो लोकांना देत आहे मोफत जेवण

एखाद्या उपाशी व्यक्तीला जेवण देणे हे पुण्याईचे काम समजले जाते. केवळ मनुष्यांनाच नाही तर प्राण्यांना देखील अन्न द्यावे. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, जी मागील 36 वर्षांपासून हेच पुण्याईचे काम करत आहे.

तामिळनाडूच्या रामेश्वरम येथे राहणारे 70 वर्षीय सीताराम दास बाबा मागील 36 वर्षांपासून दररोज 500 लोकांना मोफत जेवण देतात. बाबा सीताराम यांचा आश्रम किलावसाल येथील रामनाथ स्वामी मंदिराजवळ आहे. येथे येणारा एकही पर्यटक अथवा भाविक उपाशी जात नाही.

त्यांच्या आश्रमाचे नाव बजरंग दास बाबा आश्रम असे आहे. या आश्रमात उत्तर भारत आणि दक्षिण भारतीय दोन्ही प्रकारचे पदार्थ दिले जातात. आश्रमात येणाऱ्या व्यक्तीचा धर्म, जात, रंग, भाषा कोणत्याही आधारावर भेदभाव केला जात नाही.

सीताराम बाबा स्वतः सकाळी 5 वाजता उठतात. जेणेकरून ते आश्रमात येणाऱ्यांसाठी जेवण बनवू शकतील. त्यांचा आश्रम लोकांनी दान केलेल्या रक्कमेवर चालतो. आश्रमात केलेल्या दानावर सर्व लोकांचे पोट भरते. सीताराम बाबा यांची 10 जणांची टीम आहे, जी आश्रम योग्यरित्या चालवते.

Leave a Comment