केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा प्रदूषणापासून बचाव करण्यासाठी सल्ला, म्हणतात गाजर खा!


नवी दिल्ली – राजधानी दिल्ली सध्याच्या घडीला वायुप्रदषुणाच्या संकटाचा सामना करत असल्यामुळे नागरिकांना घराच्या बाहेर पडणे आरोग्यासाठी धोक्याचे झाले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या पार्श्वभूमीवर लोकांना निरोगी राहण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला आहे.


शरिराला अ-जीवनसत्त्व, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडेंट गाजर खाल्याने मिळते. ज्यामुळे रात्रआंधळेपणा कमी होतो. गाजर खाल्याने प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांनादेखील रोखता येऊ शकते, असे टि्वट हर्षवर्धन यांनी केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी जीवन अभियानाची प्रसिद्धी केली आहे.

हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार दिल्लीमध्ये हवेचा स्तर 500 निर्देशांकावर पोहचला आहे. प्रदुषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिक करत असल्यामुळे शहरामध्ये आरोग्य आणिबाणी आली आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाने शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सकाळी व्यायामासाठी तसेच दिवसभर नागरिक मास्क लावून बाहेर पडत आहेत.

Leave a Comment