त्या एका ट्विटमुळे ट्रोल झाले केंद्रीय पर्यावरण मंत्री

राजधानी दिल्लीत प्रदुषणाचा स्तर वाढतच चालला आहे. लोकांना घराबाहेर पडण्यास देखील त्रास होत आहे. लहानापासून ते वृध्दांपर्यंत सर्वांनाच प्रदुषणाचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. यातच आता केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी लोकांना संगीत ऐकण्याचे सुचविले आहे.

पर्यावरणमंत्री प्रदुषण आणि पर्यावरणावर न बोलता संगीत ऐकायला सांगत असल्याने युजर्स देखील चांगलेच भडकले. संगीत ऐकायला सांगण्यापेक्षा पर्यावरणविषयी बोला असा उलट सल्लाच नेटकऱ्यांनी प्रकाश जावडेकर यांना दिला आहे.

प्रकाश जावडेकर यांनी ट्विट केले की, आपल्या दिवसाची सुरूवात संगीताने करा. यासाठी त्यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला.

जावडेकरांनी हे ट्विट करताच, मग काय नेटकरी चांगलेच भडकले. एका युजरने लिहिले की, दिवसाची सुरूवात आम्हाला चांगल्या हवेने करायची आहे.

तर एका युजरने लिहिले की, 100-200 अधिक घ्या मात्र, प्रदुषणाविषयी स्वतःची जबाबदारी सांभाळा.

Leave a Comment