देशात पहिल्यांदाच मॅरोथॉनमध्ये एकत्र धावले सैनिक आणि नागरिक

मध्य प्रदेशच्या इंदौर जिल्ह्यातील छावणी कस्बा भागात सैन्याने इन्फ्रेंटी डेच्या निमित्ताने काल मॅरोथॉनचे आयोजन केले होते. ही देशातील पहिलीच अशी वेळ होती, जेथे सैनिकांबरोबर सामान्य नागरिक देखील धावले.   5, 10 आणि 21 किमीमध्ये या तीन वर्ग 5 हजारांपेक्षा अधिक धावपटूंनी मॅरोथॉनमध्ये सहभाग घेतला होता. छावणी कस्बा येथील मैदान एखाद्या बॅटल फील्डप्रमाणेच सजवण्यात आले होते.

(Source)

मॅरोथॉनमध्ये परदेशातून आलेल्या सैनिकांनी देखील भाग घेतला. यामध्ये पश्चिमी आफ्रिकेच्या सैनिकांची संख्या मोठी होती. 21 किमीच्या मॅरोथॉनमध्ये पहिले स्थान उत्तराखंडवरून आलेले सैनिक विपिन सिंह यांनी पटकावले. त्यांनी 1 तास 11 मिनिटात मॅरोथॉन पुर्ण केली.

(source)

इंन्फ्रेंटी डेच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या मॅरोथॉन दरम्यान सैन्याच्या एअरक्राफ्टने दोनदा उड्डाण घेतले. या एअरक्राफ्टमधून यावर तिरंगा आणि मॅरोथॉनचे बॅनर लावलेले होते व त्यातून पुष्पवर्षा करण्यात आली.

Leave a Comment