1000 वर्षांपुर्वीच्या महिलेच्या अवशेषांपासून वैज्ञानिकांनी बनविला खरा चेहरा

वैज्ञानिकांनी चक्क 1000 वर्षांपुर्वीच्या एका महिला वायकिंगच्या अवशेषांद्वारे तिचा खरा चेहरा बनविला आहे. 1 हजार वर्षांपुर्वी ही महिला अशीच दिसायची असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. वायकिंग हा लुटपाटकरून साम्राज्य वाढवणारा समूह होता. या कारणामुळे हा समुदाय नेहमी भटकंती करत असे. नॉर्वेमध्ये याच समुदायाच्या एक महिलेचे अवशेष सापल्यानंतर वैज्ञानिकांनी तिचा चेहरा पुन्हा बनविला आहे.

रिपोर्टनुसार, या महिलेचे अवशेष नॉर्वेमधील वाइगिंक ग्रेवयार्ड येथे सापडले. हे अवशेष आता अब ओस्लो येथील म्युझियम ऑफ कल्चरल हिस्ट्री येथे ठेवण्यात आले आहेत. वैज्ञानिकांना या थडग्याजवळ सापळ्याशिवाय तीर, तलवार, भाला आणि कुऱ्हाड सारखी हत्यारं सापडली.

(Source)

वैज्ञानिकांना महिलेच्या खोपडीवर जख्मेची खूण दिसून आली.  तिच्या कपळावरील जख्मेमुळेच तिचा मृत्यू झाला आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही. मात्र एक वायकिंग महिलेला लढाई करताना झालेल्या जख्मेचा हा पहिला पुरावा आहे.

वैज्ञानिकांनी Facial Recognition Technology द्वारे या महिलेचा चेहरा पुन्हा बनविला आहे. चेहऱ्याला शरीराच्या मांसपेशी आणि त्वचेपासूनच बनविण्यात आलेले आहे. चेहऱ्याची पुनर्निमिती करण्याची प्रक्रियेवरी डॉक्युमेंट्री नॅशनल जियोग्राफीवर 3 डिसेंबरला दाखविली जाणार आहे.

Leave a Comment