या देशातील विद्यार्थ्यांवर ‘होमवर्क कर्फ्यू’, रात्री 10च्या आत झोपणे अनिवार्य

मुलांनी शाळेत चांगले मार्क्स मिळवून, चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन घ्यावे असे प्रत्येक आई-वडिलांना वाटत असते. यासाठी मुलांवर दबाव देखील टाकला जातो. आई-वडिल यासाठी प्रत्येक प्रयत्न करतात.  आता चीनमध्ये एका शिक्षण विभागाने एक प्रस्ताव पारित करण्यात आला असून, त्या अंतर्गत प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांना रात्री 10 च्या आत झोपवणे अनिवार्य आहे.

चीनच्या झेजियांग प्रांतात हा चर्चेचा विषय ठरला आहे. नियमांनुसार, शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असो अथवा नसो, 10 च्या आत त्यांना झोपवणे गरजेचे आहे. अभ्यासापेक्षा झोप महत्त्वाची आहे. याशिवाय पालकांना आठवड्याच्या शेवटी मुलांसाठी ट्यूटर ठेवण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रात्रीत 9 च्या आत झोपणे गरजेचे आहे. मात्र पालकांमध्ये या नियमांप्रती राग आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या मुळे मुलं मागे पडतील. हा ‘होमवर्क कर्फ्यू’ आहे, असे देखील पालकांनी म्हटले आहे.

पुर्व झेजियांग प्रातांतील शिक्षण विभागाने असे 33 नियम प्रकाशित केले आहेत. यानुसार, विद्यार्थ्यांवर अभ्यासासाठी दबाव टाकला जाऊ नये. त्यांचा अभ्यास झाला नसला तरी वेळेत झोपवावे व आठवड्याच्या शेवटी व सुट्यांच्या दिवशी त्यांना अभ्यास करायला सांगू नये, असे नियम आहेत.

चीनमध्ये पालक आपल्या मुलांवर अभ्यासासाठी दबाव टाकत असतात. कारण तेथे युनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी गाओकाओ परिक्षा द्यावी लागते. ही सर्वात कठीण परिक्षा असते. युनिवर्सिटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे शालेय काळातच आई-वडिल विद्यार्थ्यांवर दबाब टाकतात.

 

Leave a Comment