एकापाठोपाठ एक चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार होत असल्यामुळे चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर तगडी टक्कर पाहायला मिळते. अक्षय कुमारचे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करण्यात यशस्वी ठरत आहेत. त्याचे चित्रपट नव्या दमाच्या कलाकारांनाही मागे टाकत एकापाठोपाठ एक विक्रम रचत आहेत. त्याचे बरेच चित्रपट पुढच्या वर्षीदेखील प्रदर्शित होणार असल्यामुळे पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर त्याच्या चित्रपटाची टक्कर सलमान खानच्या चित्रपटाशी होणार आहे.
पुढच्या वर्षी ‘ईद’ला सलमानच्या राधेचा अक्षयच्या लक्ष्मीशी आमनासामना
The clash is on… #SalmanKhan versus #AkshayKumar… #Radhe versus #LaxmmiBomb. #Eid2020
— taran adarsh (@taran_adarsh) November 2, 2019
चित्रपट आणि ईदचा मुहूर्त हे सलमान खानसाठी यशाचे गमक ठरले आहे. भाईजानचा दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर चित्रपट हमखास प्रेक्षकांच्या भेटीला येतो. पण यावेळी अक्षय कुमारच्या चित्रपटाशी त्याच्या चित्रपटाची टक्कर होणार आहे.
सलमान खानने अलिकडेच त्याच्या आगामी ‘राधे’ चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाणार आहे. तर, ईदच्या दिवशी अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट देखील प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर दोघांच्याही चित्रपटांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळेल.
All set for #Eid2020… Akshay Kumar in #LaxmmiBomb… Costars Kiara Advani… Directed by Raghava Lawrence… Fox Star Studios presentation. pic.twitter.com/yLhuEz7okf
— taran adarsh (@taran_adarsh) November 2, 2019
अक्षयचा ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट यावर्षीच्या दिवाळीमध्ये प्रदर्शित झाला आहे. सध्या हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. तर, सध्या सलमान खानचा ‘दबंग ३’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. पुढच्या वर्षी देखील अक्षय कुमार, ‘सूर्यवंशी’, ‘गुड न्यूज’ आणि ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटात झळकणार असल्यामुळे या चित्रपटांना आता बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.