वाहतुक नियमांची पायमल्ली करण्यात तरुणाई अग्रेसर

ड्रायव्हिंग करताना युवक स्मार्टफोनचा वापर करताना आपण नेहमीच पाहतो. एवढेच नाही तर युवकांना एका छोट्या चुकीमुळे जीव देखील जाऊ शकतात, याची देखील पर्वा नसते. एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, युवक ड्रायव्हिंग करताना स्मार्टफोनचा वापर करू नये, या सुचनेकडे दुर्लक्ष करतात.

क्वींसलँड युनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजीच्या संशोधकांनी आपल्या अभ्यासात खुलासा केला आहे की, प्रत्येकी सहा जणांपैकी एक जण ड्रायव्हिंग करताना स्नॅपचॅटचा वापर करतात. संशोधकांनी स्नॅपचॅटचा वापर करणाऱ्या 17 ते 25 वयोगटातील 503 युवा ड्रायव्हर्सचे सर्वेक्षण केले.

सर्वेक्षणामध्ये 16 टक्के युवकांनी मान्य केले की, ते ड्रायव्हिंग करताना मोबाईल फोनवर स्नॅपचॅटचा वापर करतात. तर काहींनी मान्य केले की, केवळ बघण्यासाठी किंवा दुसऱ्यांच्या मेसेजला उत्तर देण्यासाठी ते स्नॅपचॅठ वापरतात. तर 15 टक्के युवकांनी मान्य केले की, वाहनाला कंट्रोल करत असतानाच त्यांनी स्नॅपचॅटवरून फोटो आणि व्हिडीओज पाठवले आहेत.

एका संशोधकाने सांगितले की, 15 टक्क्यांपेक्षा अधिक युवकांनी मान्य केले की, ड्रायव्हिंग करताना ते दुसऱ्यांना व्हिडीओ आणि फोटो शेअर करण्यास प्राथमिकता देतात. तर 71 टक्के युवकांनी सांगितले की, सिग्नल रेड असताना त्यांनी स्नॅपचॅट तपासले.

अभ्यासात हे देखील समोर आले की, 84 टक्के युवा ड्रायव्हर्सचे म्हणणे आहे की, ड्रायव्हिंग करताना त्यांनी कधीच स्नॅपचॅटचा वापर केला नाही. केवळ 12 टक्के युवकांनी ही गोष्ट मान्य केली. सर्वक्षणामध्ये समोर आले की, युजर्सनुसार, रेडलाइटवर स्नॅपचॅट बघणे अधिक सुरक्षित आहे.

Leave a Comment