वायुसेनेची 35 वर्ष सेवा केल्यानंतर 31 डिसेंबरला निवृत्त होणार मिग-27


नवी दिल्ली – साडेतीन दशकांपर्यंत भारतीय हवाई दलाची सेवा दिल्यानंतर मिग-27 लढाऊ विमान डिसेंबरमध्ये निवृत्त होणार आहे. भारतीय हवाई दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबर रोजी हे फ्लीट औपचारिकपणे सेवानिवृत्त होत आहे. यासाठी जोधपूर एअरबेस येथे निरोप समारंभ होणार आहे.

असे सांगितले जात आहे की स्क्वॉड्रन अधिकारी यांच्याव्यतिरिक्त, विमानाशी संलग्न असलेले वायुसेनेचे अन्य सेवारत आणि सेवानिवृत्त कर्मचारी या निरोप समारंभात भाग घेतील. भारतात त्याचे नाव ‘बहादूर’ ठेवले होते. रशियन बनावटीचे मिग -27 भारतीय सैन्यात 1984 मध्ये सामील झाले आणि तेव्हापासून त्यांनी सात ऑपरेशनल स्क्वॉड्रन आणि इतर लढाऊ प्रशिक्षण आणि रणनीती-मूल्यांकन संस्थांमध्ये काम केले आहे.

हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने (एचएएल) 2004 मध्ये 165 मिग -27 विमान तयार केले आणि त्यातील काही मिग -27 यूपीजीमध्ये सुधारित श्रेणी केली. भारतीय वायु सेनेने 35 वर्षे सतत सेवा बजावणारे मिग -27 निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे. वायुसेनेने आपल्या या नायकास 87 व्या एअरफोर्स डेच्या दिवशी निरोप दिला आहे. परंतु अधिकृतरित्या याचा जोधपूर एअरबेसवर निरोप समारंभ होईल.

Leave a Comment