मॅकडोनाल्डच्या सीईओंची अवैध संबंध प्रकरणी हकालपट्टी

मॅकडोनाल्डने सीईओ स्टीव्ह इस्टरब्रुकची हकालपट्टी केली आहे. इस्टब्रुक यांचे कंपनीतील एका कर्मचारी महिलेसोबत संबंध होते. या कारणामुळे कंपनीने हा निर्णय घेतला. कंपनीने स्पष्ट केले की, त्यांनी कंपनीच्या नियमांचे उल्लंघन केले त्यामुळे त्यांनी सीईओ आणि कंपनीच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले आहे.

याबाबत कंपनीने म्हटले की, इस्टरब्रुक यांनी चुकीचा निर्णय घेतला. कंपनीच्या नियमांनुसार, संचालक प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कंपनीतील कर्मचाऱ्यांशी संबंध ठेवू शकत नाहीत. इस्टरब्रुक हे मार्च 2015 ला कंपनीचे सीईओ झाले होते.

इस्टरब्रुक यांच्या जागी आता क्रिस केम्पकिन्सकी घेतील. केम्पकिन्सकी 2015 पासून मॅकडोनाल्डशी जोडलेले आहेत. इस्टरब्रुक यांनी कर्मचाऱ्यांना एक ई-मेल लिहून स्विकार केले की, त्यांनी एका कर्मचाऱ्यासोबत संबंध ठेवून चूक केली. याशिवाय त्यांनी बोर्डाच्या निर्णयाशी सहमत असल्याचे देखील म्हटले.

इस्टरब्रुक यांच्या नेतृत्वाखाली मॅकडोनाल्डला मोठा फायदा झाला होता. 2015 नंतर कंपनीचे स्टॉक दुप्पट झाले आहेत. इस्टरब्रुक यांनी युनिवर्सिटी ऑफ ऑक्टफर्डच्या बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. या आधी देखील त्यांचा घटस्फोट झालेला आहे.

 

Leave a Comment