या ट्रिक्स वापरुन मनसोक्त घ्या फेसबुक वापरण्याचा आनंद

फेसबुक सध्या जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. याचा वापर जगभरातील कोट्यावधी लोक करतात. फेसबुक वेळेनुसार, युजर्ससाठी अनेक नवीन फीचर्स आणत असते. फेसबुकचे असे अनेक फीचर्स आहेत, जे वापरून तुम्ही नक्कीच फेसबुक अधिक इंन्जॉय कराल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही फेसबुक ट्रिक्स सांगणार आहोत, ज्या तुम्हाला नक्की आवडतील.

जास्त पोस्ट करणाऱ्या फ्रेंडला करा स्नूज –

आपल्या प्रत्येकाच्या फ्रेंडलिस्टमध्ये अशी एकतरी व्यक्ती असते, जी सतत फेसबुकवर पोस्ट टाकते. अनेकदा या पोस्टमुळे आपल्या वैताग येतो. मात्र मित्र असल्याने अनफ्रेंड देखील करता येत नाही. यापासून वाचण्यासाठी फेसबुकने स्नूज ऑप्शन दिले आहे. यासाठी तुमच्या फ्रेंडच्या सर्वात नवीन पोस्टवर जा. पोस्टच्या बाजूला तुम्हाला तीन डॉट दिसतील. डॉट्सवर क्लिक केल्यावर तुम्हाला पोस्ट हाइड, स्नूज हे पर्याय दिसतील. येथे तुम्हाला स्नूज कितीवेळ पाहिजे हे देखील निवडता येते.

वाढदिवसाच्या नॉटिफिकेशन बंद करा –

फेसबुक आल्यापासून मित्र-मैत्रिणींचे वाढदिवस लक्षात ठेवण्याची गरज राहिलेली नाही. मात्र अनेकदा आपल्या सकाळी उठल्यावर गरज नसेल अशा व्यक्तींचे देखील बर्थडे नॉटिफिकेशन फेसबुकवर दिसते. हे फीचर बंद करण्यासाठी नॉटिफिकेश्नस पर्यायावर जाऊन तुम्ही बर्थडे नॉटिफिकेश्नस बंद करू शकता.

फेसबुक डेटा करा डाउनलोड –

फेसबुक युजर्सला त्यांचा संपुर्ण डेटा डाउनलोड करण्याचा देखील पर्याय मिळतो. फेसबुक डेटा डाउनलोड करण्यासाठी सेटिंग्समध्ये जा. तेथे तुम्हाला Your Facebook Information पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर Download Your Information हा पर्याय दिसेल. तेथून तुम्ही संपुर्ण डेटा डाउनलोड करू शकता.

अॅप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट बंद करा –

फेसबुकवर अनेक अॅप इन्वाइट्स आणि गेम रिक्वेस्ट येतात. जर तुम्हाला या नॉटिफिकेश्नस बंद करायच्या असतील तर, सेटिंग्समध्ये जाऊन ब्लॉकिंग पर्यायावर क्लिक करा. खाली तुम्हाला ब्लॉक अॅप इन्वाइट्स पर्याय दिसेल.

फेसबुक मेसेजवर ‘Seen’ बंद करा –

जर तुमच्याबरोबर चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही त्यांचा मेसेज वाचला आहे की नाही हे माहिती पडू द्यायचे नसेल तर तुम्ही मेसेज वाचल्यानंतर येणारे ‘Seen’ बंद करू शकता. यासाठी तुम्हाला  Unseen for Facebook Chrome extension डाउनलोड करावे लागेल. हे डाउनलोड केल्यानंतर ब्राउजर टूलबारवर देण्यात आलेल्या मेसेंजर चिन्हावर क्लिक केल्यावर ते सुरू होईल.

युजर्सपासून लपवा तुमचे ऑनलाइन स्टेट्स –

फेसबुकच्या खास फीचर पैकी एक फीचर म्हणजे तुम्ही ठराविक लोकांसाठी तुमटे ऑनलाइन स्टेट्स आणि मेसेजेस ब्लॉक करू शकता. यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला ब्लॉकिंग पर्यायावर जावे लागेल. येथे तुम्हाला ब्लॉक युजर पर्याय दिसेल. त्यानंतर तुम्ही ज्या युजर्सला ब्लॉक करायचे आहे त्यांचे नाव सर्च करा. यानंतर त्या युजर्सचे मेसेज तुम्हाला येणार नाहीत.

नंतर वाचण्यासाठी लिंक करा सेव्ह –

फेसबुकवर स्क्रोल करत असताना अनेकदा असे आर्टिक्लस दिसतात, जे तुम्हाला वाचायचे असतात. मात्र वेळ किंवा तुम्हा योग्य ठिकाणी नसल्याने ते वाचू शकत नाही. अशावेळी तुम्ही एखाद्या पोस्टच्या डॉट्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह लिंक पर्याय दिसेल. या पर्यायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुम्हाला हवे असलेले आर्टिक्लस नंतर वाचू शकता. आर्टिक्लस वाचण्यासाठी तुम्ही सेव्हड सेक्शनमध्ये जाऊन वाचू शकता.

Leave a Comment