हेरगिरी प्रकरणामुळे व्हॉट्सअ‍ॅपचे हे खास फीचर लटकणार

व्हॉट्सअ‍ॅप हेरगिरी प्रकरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. व्हॉट्सअ‍ॅप लवकरच आपली डिजिटल पेमेंट सेवा भारतात सुरू करणार होते, मात्र आता या हेरगिरी प्रकरणामुळे हे फीचर लाँच न करण्याची शक्यता आहे. सरकारसाठी पेमेंट सेवेसाठी डेटा सुरक्षित असणे महत्त्वाचे आहे. सरकार व्हॉट्सअ‍ॅपच्या महत्त्वाच्या मुद्यांची माहिती घेऊनच या सेवेला परवानगी देईल. पेमेंट सेवेसाठी सुरक्षित प्लॅटफॉर्म असणे गरजेचे आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, हॅकिंग प्रकरणानंतर कंपनीच्या प्लॅन आणि प्लॅटफॉर्मवर नक्कीच प्रश्न उपस्थित केले जाणार. सरकारने व्हॉट्सअ‍ॅपला डेटा सुरक्षेबाबत मेल देखील पाठवला होता. मात्र याचे अद्याप उत्तर आलेले नाही. भारतात सध्या व्हॉट्सअ‍ॅपचे 40 कोटींपेक्षा अधिक युजर्स आहेत. त्यामुळेच कंपनी भारतात पेमेंट सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र हेरगिरी प्रकरणामुळे ही सेवा प्रलंबित होऊ शकते.

दरम्यान, इस्त्रायलच्या एनएसओ ग्रुपने पिगासस स्पायवेअरचा वापर करून भारतातील अनेक पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप हॅक करत माहिती चोरी केली आहे. यावरून व्हॉट्सअ‍ॅपच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Comment