यापैकी कोणता तुमचा पासवर्ड असेल तर त्वरीत बदला


सध्या सायबर गुन्ह्यात प्रचंड वाढ होत असून कोणत्याही युजर्सचा डेटा सध्या हॅकर अगदी सहजतेने हॅक करत आहेत. हॅकर्स त्यासाठी युजर्सची संपूर्ण माहिती घेत त्याच्या पासवर्ड चोरी करतात. अशा गोष्टींची चोरी हॅकर्स करतात ज्या गोष्टी एखाद्याच्या विरोधात कटकारस्थान रचण्यासाठी वापरले जाऊ शकतात. पण हॅकर्सला काहीवेळेस युजर्सचा पासवर्ड हॅक करणे सोपे होते. कारण आपल्या पासवर्ड बाबत काहीजण अधिक निष्काळजीपणाने वागतात. याबाबत सायबर सिक्योरिटी फर्म ImmuniWeb यांनी केलेल्या एका नव्या संशोधनानुसार, जगातील 500 प्रसिद्ध कंपन्यांमधील कोट्यावधी युजर्सचे अकाउंट हॅक करण्यात आले आहेत.

त्यांच्या अहवालात असे ही सांगण्यात आले आहे की, हॅक करण्यात आलेल्या अनेक युजर्सचे पासवर्ड एकसारखेच होते. म्हणजेच युजर्सची गोपनिय माहिती त्यांना सहज हॅक करता आली. तसेच सोप्या पद्धतीचे बहुतांश अकाउंट्सचे पासवर्ड असल्याचे ही सांगण्यात आले आहे. तर आम्ही आज तुम्हाला त्या पासवर्डबद्दल सांगणार आहोत त्याचा वापर करत असल्यास तुमची गोपनिय माहिती हॅक होईल. त्यामुळेच वेळीच सावध व्हा.

हे आहेत हॅक करण्यात आलेले पासवर्ड
000000, 111111, 112233, 123456, 12345678, 123456789, 1qaz2wsx, 3154061, 456a33, 66936455, 789_234, aaaaaa, abc123, career121, carrier, comdy, cheer!, cheesy, Exigent, old123ma, opensesame, pass1, passer, passw0rd, password, password1, penispenis, snowman, !qaz1qaz, soccer1, student, welcome

त्यामुळे तुमच्या पासवर्डचा हॅकर्सपासून बचाव करण्यासाठी एकाच अनुक्रमाने येणारे अक्षर किंवा क्रमांक ठेवू नये. नेहमी तुमचा पासवर्ड अल्फा न्युमेरिक कॅरेक्टरमध्ये सेट करा. त्याचसोबत पासवर्डमध्ये एका स्पेशल कॅरेक्टरचा सुद्धा वापर करा. लक्षात असू द्या तुम्ही एक साधारण पासवर्ड तयार केला असल्यास तो हॅक होण्याची 200 पट अधिक शक्यता असते.

Leave a Comment