मॅच फिक्सिंगची ऑफर देणाऱ्या बुकीला त्याला रुममध्ये बंद करुन बेदम मारले


मॅच फिक्सिंगवर माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरने अजून एक खुलासा केला आहे. तो याबाबत सांगताना म्हणाला की, एका बुकीने एकदा त्याला मॅच फिक्स करण्याबाबत विचारणा केली होती. शोएबला त्याबदल्यात 10 लाख डॉलर, दोन एस-क्लास मर्सडीज कार आणि लंडनच्या फुलहाममध्ये एक फ्लॅट देण्याची ऑफर दिली होती. शोएबने त्यानंतर त्या बुकीला एका रूममध्ये नेऊन बेदम मारले होते.

2010 च्या एका घटनेबाबत बोलताना शोएबने सांगितले की, मॅच फिक्सिंगमध्ये पाकिस्तान टीम अडकली होती. त्याच्या समोर मैदानावर 21 खेळाडू असायचे. 10 पाकिस्तान टीमचे आणि 11 विरोधी टीमचे. एका टॉक शोमध्ये दोन दिवसांपूर्वी बोलत असताना त्याने हा खुलासा केला. शोएबने सांगितले की, पाकिस्तान टीमसोबत मी इंग्लंड दौऱ्यावर होतो. एक बुकी तेव्हा माझ्या रूममध्ये आला. मला त्याने मॅच फिक्सिंगची ऑफर दिल्यानंतर त्याला मी रूममध्येच बेदम मारले होते.

नेहमीच पाकिस्तानी खेळाडूंवर मॅच किंवा स्पॉट फिक्सिंगचे आरोप लागत आले आहेत. शोएब याबाबत म्हणाला की, तुम्हाला मी ब्रेकिंग न्यूज देत आहे. मला मोहम्मद आसिफने सांगितले की, किती आणि कोणासोबत त्याने मॅच फिक्स केले आहेत. हेच आमिरनेही केले. तर त्या दोघांना मारायला मी गेलो होतो. मॅच फिक्स करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूंनी देशाचा घात केला आहे. त्यांनी गुन्हा केला आहे.

पाकिस्तानी खेळाडूंवर अनेकवेळा मॅच फिक्सिंगचे आरोप लागत आले आहेत. पाकिस्तानी फिक्सर्सची लिस्ट मोठी आहे, पण यात काही अग्रेसर नाव म्हणजे, सलीम मलिक, मोहम्मद आसिफ, सलमान बट, शर्जील खान आणि मोहम्मद आमिर यांचे आहेत.

Leave a Comment