‘बाँड’पटातील व्हिलनच्या कारचा होणार लिलाव, किंमत कोटींच्या घरात

जेम्स बाँडच्या चित्रपटाशी संबंधित गाड्यांची लिलाव नेहमीच होत आला आहे. या गाड्यांवर कोट्यावधींची बोली लागते. आतापर्यंत या चित्रपटांचा हिरो जेम्स बाँडच्या गाड्यांचाच लिलाव होत आला आहे. मात्र आता युएईची राजधानी अबुधाबीमध्ये 30 नोव्हेंबर रोजी शेवटचा जेम्स बाँड चित्रपट ‘स्पेक्टर’मध्ये वापरण्यात आलेल्या कारचा लिलाव होणार आहे. मात्र ही कार या चित्रपटातील मुख्य व्हिलन मिस्टर हिंक्सने चालवली होती.

ही कार जॅग्युआर सी-एक्स 75 मॉडेल आहे. याचे स्पेशल एडिशन केवळ याच चित्रपटासाठी बनविण्यात आले होते. लिलावात या कारसाठी 12 लाख डॉलर (8.4 कोटी रूपये) पर्यंत बोली लागण्याची शक्यता आहे.

Leave a Comment