कल्की पूर्वी या अभिनेत्री देखील लग्नाआधी राहिल्या आहेत गरोदर


काही दिवसांपूर्वीच बॉलिवूड अभिनेत्री कल्की कोचलिनने आपण गरोदर असल्याची माहिती सोशल मीडियावरुन दिली होती. कल्कीने अनुराग कश्यपपासून विभक्त झाल्यानंतर अद्याप लग्न केलेले नाही त्यामुळे मुलाचा बाप कोण अशा शब्दात सोशल मीडियावर तिला ट्रोलही करण्यात आले होते. पण कल्की अशाप्रकारे लग्नाच्या आधीच आई होणारी पहिलीच अभिनेत्री नाही. आम्ही आज तुम्हाला बॉलीवूडमधील आतापर्यंत अशा गरोदर राहिलेल्या अभिनेत्रींबाबत सांगणार आहोत. चला मग जाणून घेऊयात आतापर्यंत कोणत्या अभिनेत्री लग्नाच्या आधीच राहिल्या गरोदर होत्या.

काही महिन्यांपूर्वीच बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला हिने मुलाला जन्म दिला. पण अद्याप अर्जुन आणि गॅब्रिएलाचे लग्न झालेले नाही. पण ते लवकरच लग्न करतील अशी चर्चा आहे.

लग्नाआधी बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपियाही गरोदर राहिली होती. त्यामुळे तडकाफडकी नेहा आणि अंगद बेदीने लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

लग्नाआधी अभिनेत्री कोंकणा सेन शर्माही गरोदर राहिली होती. प्रियकर रणवीर शौरीशी तिने 3 डिसेंबर 2010 मध्ये लग्न केले. तर कोंकणाला २०११ मध्ये मुलगा झाला. रणवीर आणि कोंकणाचा 2015 मध्ये घटस्फोट झाला. पण त्यांच्यातील मैत्री अजून कायम असून दोघे मिळून मुलाला सांभाळतात.

एक कणखर सिंगल मदर म्हणून नीना गुप्ता यांच्याकडे पाहिले जाते. वेस्ट इंडीजचे महान क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्यावर नीना यांचे प्रेम होते. मसाबाचा या प्रेमातूनच जन्म झाला. विवियन आणि निना यांचे कधी लग्न झाले नाही. कारण विवियन यांनी पहिल्या पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. नीना यांनी एकट्यानेच मसाबाचा सांभाळ केला आणि ती आज देशातील नावाजलेल्या फॅशन डिझायनरपैकी एक आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हसन आणि अभिनेत्री सारिका यांचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरही काही काळ चर्चेत होते. सारिकाशी लग्न करण्यासाठी कमल यांनी वाणी गणपतीसोबतचे 10 वर्षांचे नाते मोडले. कमल यांनी वाणीला घटस्फोट दिल्यानंतर सारिकाशी लग्न केले. कमल आणि सारिकाने श्रुती हसनच्या जन्मानंतर लग्न केले होते.

Leave a Comment