हजारो झाडे लावत आजीबाईंनी निर्माण केले जंगल

सध्या हवामान बदलामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. प्रदुषणामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होत आहे. अशावेळी आपल्या आजुबाजूच्या परिसरात झाडे लावून पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. उत्तराखंडमधील एका आजीबाईंनी अशीच कामगिरी केली आहे, ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

(Source)

उत्तराखंडमधील रूद्रप्रयाग जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या प्रभादेवी या आजींनी 500 पेक्षा अधिक झाडे लावत, एका नवीन जंगलाचीच निर्मिती केली आहे. कदाचित त्यांना हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग या गोष्टी माहिती नसतील, मात्र निसर्गाला वाचवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे, हे त्यांना माहिती आहे. या आजींना जेव्हा वेळ मिळतो त्या झाडे लावतात. त्यांच्या घराच्या आजुबाजूला फळ-फुलांचीच झाडेच झाडे आहेत.

(Source)

या आजींना 25 वर्षांचा नातू देखील आहे, त्याचे नाव अतूल सोमवाल आहे. तो म्हणाला की, मागील काही वर्षांपासून नोकरीमुळे आजीपासून लांब देहरादून येथे राहत आहे, मात्र लहानपण गावातच गेले. अतूलनुसार, त्याने आजीला कधी रिकामे बसलेले बघितलेच नाही, त्या काहींना काही काम करत स्वतःला व्यस्त ठेवतात. आजींचे वय 76 वर्ष आहे, तरी देखील त्या सकाळी 5 वाजता उठतात.

(Source)

प्राण्यांना जेव्हा चाऱ्याची गरज असते, त्यावेळी त्या गवत वरूनच कापतात. त्यांनी आजपर्यंत एकही झाड मुळापासून उखडून काढलेले नाही. आजींनी भरपूर झाडे लावली आहेत व त्या त्यांची काळजी देखील घेतात.

(Source)

या आजींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या झाडांना आलेली फळे त्या बाजारात न विकता, आजुबाजूच्या भागात लोकांना वाटून टाकतात. आजींसाठी त्यांचे हे जंगलच सर्वकाही आहे. आजींची मुलं कामानिमित्त नोकरीपासून बाहेर असतात, त्यांनी अनेकदा आजींना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र आजींनी आपले गाव आणि जंगल काही सोडले नाही.

 

Leave a Comment