टिकटॉकच्या कंपनीने लाँच केला पहिला स्मार्टफोन

टिकटॉकच्या मालकीची कंपनी बाइटडान्सने आपला पहिला स्मार्टफोन स्मार्टसन जियांगुओ प्रो 3 लाँच केला आहे.  या फोनमध्ये पॉवरफुल प्रोसेसर आणि मल्टी रिअर कॅमेरा देण्यात आला आहे.

फोनमध्ये 6.39 इंच फूल एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून, त्याचे रिजॉल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. हा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजमध्ये मिळेल. फोनमध्ये स्नॅपडँग्रन 855+ प्रोसेसर मिळेल. याचबरोबर हा फोन स्मार्टसन ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. अँड्राईडच्या कोणत्या व्हर्जनवर हा फोन बेस्ड आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

(Source)

कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर चार रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48 मेगापिक्सल प्रायमेरी कॅमेऱ्यासोबत 13 मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा, 8 मेगापिक्सल टेलिफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळेल.

(source)

या स्मार्टफोनमध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून, कनेक्टिविटीसाठी ब्लूटूथ 5.0, वाय-फाय a/b/g/n/ac, जीपीएस, GLONASS गॅलिलीयो आणि वाय-फाय डायरेक्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. बॅटरीसोबत 18 वॉट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

(source)

कंपनीने हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. यात 8जीबी+128जीबी व्हेरिएंटची किंमत 2,899 युआन (जवळपास 29000 रुपये), 8जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत 3,199 युआन (जवळपास 32000 रुपये) आणि 12जीबी+256जीबी व्हेरिएंटची किंमत 3,599 युआन (जवळपास 36000 रुपये) आहे. सध्या हा स्मार्टफोन केवळ चीनमध्येच लाँच करण्यात आला आहे.

 

Leave a Comment