एलॉन मस्क यांचा ट्विटरला रामराम

अमेरिकेची कार कंपनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी बातमी आणि चर्चा करता येणारे प्लॅटफॉर्म रेडिटशी जोडणार असल्याचे संकेत दिले आहेत. मस्क यांनी ट्विट केले की, ट्विटर चांगले होईल की माहित नाही, मात्र रेडिट अद्याप चांगले दिसत आहे.

https://twitter.com/elonmusk/status/1190292298694680577

https://twitter.com/elonmusk/status/1190288778767691777

आपल्या ट्विटमुळे एलॉन मस्क नेहमीच चर्चेत राहतात. अनेकदा आपल्या ट्विटमुळे ते अडचणीत देखील सापडले आहेत. ट्विटर अद्याप त्यांचे खाते बंद झालेले नाही. त्यांचे ट्विटरवर 29 मिलियन फॉलोवर्स आहेत. ट्विटर सोडत असल्याने अनेक युजर्सनी दुःख देखील व्यक्त केले.

Leave a Comment