भारतात गुंतवणुकीसाठी ही सर्वोत्तम वेळ – मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसीय थायलंडच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी बँकॉक येथील कार्यक्रमात बोलताना मोदींनी भारतात गुंतवणुकीसाठी सध्या सर्वोत्तम वेळ असल्याचे म्हटले आहे.

एका औद्योगिक कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, मागील 5 वर्षांमध्ये भारतात 286 बिलियन डॉलरची थेट परकीय गुंतवणूक झालेली आहे. ही रक्कम मागील 20 वर्षांच्या गुंतवणूकीच्या आर्धी आहे.

गुंतवणुकीसाठी भारत हा पहिल्या 10 देशांमध्ये येतो. मागील 5 वर्षात जागतिक बँकेच्या इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये भारताने 79 स्थांनाची झेप घेतली आहे. मी विश्वासाने सांगतो की, गुंतवणुकीसाठी भारत हे सर्वोत्तम ठिकाण आहे, असे म्हणत मोदींनी भारतात गुंतवणुकीसाठी उद्योजकांना आवाहन केले.

मोदी म्हणाले की, 2014 मध्ये आमचे सरकार आले त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था ही 2 ट्रिलियन डॉलर एवढी होती, मात्र मागील पाच वर्षात भारताची अर्थव्यवस्था 3 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहचली आहे. पर्यटकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी भारताचे दरवाजे नेहमीच उघडे आहेत, असे म्हणत त्यांनी गुंतवणूकदारांना भारतात येण्याचे आवाहन केले.

 

Leave a Comment