सध्या महाराष्ट्रात सरकार स्थापनेवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपली आहे. अशा परिस्थितीत शिवसेने नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असून, आमच्याकडे बहुमताचा आकडा आहे. सध्या शिवसेनेला 170 आमदारांचे समर्थन असून, हा आकडा 175 पर्यंत जाईल,असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार – संजय राऊत
निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. याशिवाय काँग्रेसकडे 44 आणि राष्ट्रवादीचे 54 आमदार आहे व अपक्ष उमेदवारांचा पाठिंबा घेतल्यावर शिवसेना 170 चा आकडा गाठू शकते.
याशिवाय शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील शिवसेना म्हणत असेल मुख्यमंत्री त्यांचा होणार तर ते शक्य आहे, असे म्हटले आहे.
संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर भाजप काय पावित्रा घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटले असले तरी, एकाही पक्षाने सत्ता स्थापनेचा अद्याप दावा केला नाही. भाजप आणि सेनेमध्ये 50-50 फॉर्म्युल्याच्या मुद्यावरून वाद सुरू आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने जनतेने आम्हाला विरोधात बसण्यासाठी निवडले असल्याचे म्हटले आहे.
