मागील 5 वर्षात सायबर गुन्ह्यात 457 टक्क्यांनी वाढ

सध्या सायबर गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इंटरनेटमुळे पैसा आणि प्रायव्हेसी दोन्ही धोक्यात आले आहे. काही दिवसांपुर्वीच 13 लाख भारतीयांच्या क्रेडिट-डेबिट कार्डची माहिती चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याशिवाय व्हॉट्सअॅपवर देखील 1400 भारतीयांची हेरगिरी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या घटनांमुळे इंटरनेटवरील सुरक्षितता धोक्यात आली आहे.

असोचॅम-एनईसीने केलेल्या अभ्यासानुसार, मागील पाच वर्षात (2011-2016) सायबर गुन्ह्यांचे प्रमाण 457 टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. सायबर गुन्हात बँकिंग फसवणुकीचे प्रमाण मागील दोन वर्षात दुप्पटीने वाढले आहे. मागील वर्षी सायबर फ्रॉडचे 71.3 कोटी रूपयांचे 1866 प्रकरण समोर आले आहेत. सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढत असल्याने या क्षेत्रात विमा घेण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.

डेटा सिक्युरिटी काउंसिल ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, 2018 मध्ये सायबर विम्यात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. या वर्षी 350 सायबर विमा घेण्यात आले आहेत. पुढील काळा सायबर विम्याचे प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे.

सायबर गुन्ह्यापासून वाचवण्यासाठी कोणतेही थर्ट पार्टी अॅप वापरण्यापासून लांब रहा. याशिवाय सोशल मीडियावर खाजगी माहिती शेअर करणे टाळा. कोणत्याही फेक लिंकवर जाऊन स्वतःची खाजगी माहिती देऊ नका.

 

Leave a Comment