प्रियंका गांधींचे व्हॉट्सॲप देखील हॅक – काँग्रेस

व्हॉट्सॲपच्या माध्यमातून भारतातील पत्रकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी करण्यात आल्याचे प्रकरण सध्या चर्चेत आहे. यावर आता काँग्रेस पक्षाने दावा केला आहे की, काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना देखील हॅकिंगचे मेसेज आले होते. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, जेव्हा व्हॉट्सॲपद्वारे लोकांना फोन हॅक करण्यासाठी संदेश पाठवण्यात आले होते, त्यामध्ये एक संदेश प्रियंका गांधी यांना देखील आला होता.

सुरजेवाला म्हणाले की, पिगासस स्पायवेअर हा केवळ सरकारलाच विकला जाऊ शकतो. 2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पिगासस स्पायवेअरद्वारे नेते, पत्रकार आणि कार्यकर्त्यांचे फोन टॅप करण्यात आले आणि सरकारला याची माहिती होती.

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा या देखील या प्रकरणावर सरकारवर निशाणा साधत म्हणाल्या की, जर असे केले गेले असेल तर याचा राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा परिणाम होईल.

त्यांनी ट्विट केले होते की, जर भाजप अथवा सरकारने पत्रकार, वकिल, सामजिक कार्यकर्ते आणि नेत्यांच्या फोनची हेरगिरी करण्यासाठी इस्त्रायलच्या एजेंसीला कामाला लावले असेल तर हे मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. हे राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम करणारे मोठे स्कँडल आहे.

 

Leave a Comment