स्वस्तात मस्त ! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा हे 5 स्मार्टफोन

सध्या दररोज एकतरी स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. अनेक कंपन्यांच्या फोनमध्ये शानदार प्रिमियम फीचर्स देण्यात आलेले असतात आणि त्याची किंमत देखील कमी असते. अशा वेळी कोणता फोन खरेदी करायचा हे आपल्या लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला असेच काही स्मार्टफोन सांगणार आहोत, ज्यामध्ये शानदार फीचर्स तर आहेत, पण हे फोन 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत बाजारात उपलब्ध आहेत.

(Source)

सॅमसंग गॅलेक्सी एम-30

9,999 रूपये किंमत असणाऱ्या या फोनमध्ये 6.4 इंच सुपर AMOLED फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात 6जीबी रॅम+128 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंट देखील आहे. फोन अँड्राईड 9 पायवरील  OneUI वर काम करतो. यामध्ये Exynos 7904 चिपसेट प्रोसेसर देण्यात आला आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात 13 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सल + 5 मेगापिक्सलचा ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय 15 वॉट फास्ट चार्जिंगसोबत 5000mAh ची बॅटरी देखील यात मिळेल.

(Source)

रेडमी 8

रेडमी 8 ची किंमत 7,999 रूपये असून, यामध्ये 6.22 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. 4 जीबी रॅम + 64 जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येणाऱ्या या फोनमध्ये स्नॅपड्रँगन 4939 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये 12 मेगापिक्सल+2 मेगापिक्सलचा ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

(Source)

इनफिनिक्स एस5 –

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनमध्ये 6.6 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे. फोनमध्ये क्वॉड रिअर कॅमेरा देण्यात आला असून, त्याचा प्रायमेरी कॅमेरा 16 मेगापिक्सल आहे. फोनचा फ्रंट कॅमेरा हा 32 मेगापिक्सलचा आहे. 8,999 रूपयांच्या किंमतीत येणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक पी22 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 4,000mAh बॅटरी आहे.

(Source)

मोटोरोला वन मॅक्रो –

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन काही दिवसांपुर्वीच लाँच झाला आहे. 4जीबी रॅम+64 जीबी स्टोरेज सोबत येणाऱ्या या फोनची किंमत 9,999 रूपये आहे. फोनमध्ये 6.2 इंच एचडी+ एलसीडी स्क्रीन देण्यात आलेली आहे. फोन अँड्राईड वन ओएस सोबत येतो. प्रोसेसरबद्दल सांगायचे तर यात मीडियाटेकचा हीलियो पी70 प्रोसेसर आहे. फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी असून, ती 10 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत येते.

या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा असून, 13 मेगापिक्सलचा प्रायमेरी कॅमेरा आहे. सेल्फीसाठी यात 8 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

(Source)

रिअलमी 5

रिअलमी 5 ची किंमत 8,999 पासून सुरू होते. फोनमध्ये 6.5 इंचच्या नॉच डिस्प्ले सोबत एचडी+ रिजॉल्यूशन देण्यात आले आहे. स्नॅपड्रॅगन 655 प्रोसेसरसोबत येणाऱ्या या फोनमध्ये 5000mAh मिळेल. यात 4 रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आले आहेत. यामध्ये 12 मेगापिक्सल+8 मेगापिक्सल+ 2 मेगापिक्सल + 2 मेगापिक्सल कॅमेरे आहेत. तर सेल्फीसाठी 13 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

 

Leave a Comment