आनंद महिंद्राचा प्रश्न – विमानतळावर भारतीयांना एवढ्या व्हिलचेअर्सची गरज काय ?

महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे ट्विटरवर सक्रीय असतात. शनिवारी त्यांनी एका ट्विटमध्ये आश्चर्यव्यक्त करत म्हटले की, भारतीय विमानतळावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हिलचेअर का मागतात ? असा प्रश्न उपस्थित केला. या व्हिलचेअरचा गैरवापर करण्यात येतो का असाही प्रश्न त्यांनी केला ? आनंद महिंद्रांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये चांगलीच जुंपली.

आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, अनेक विमानतळावर भारतात येणा-जाणाऱ्या प्लाईट्ससाठी मोठ्या संख्येत व्हिलचेअर प्री ऑर्डर करण्यात येतात. हे असे का केले जाते हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.

त्यानंतर त्यांनी लिहिले की, इतरांपेक्षा भारतीय वृध्द व्यक्ती अधिक प्रवास करतात का ? का आपल्याकडे अधिक अशक्त आणि अयोग्य व्यक्त आहेत ? का आपण फक्त जुगाडू आहोत, जे रांगेपासून वाचण्यासाठी व्हिलचेअरचा मागवतात ? असे प्रश्न त्यांनी विचारले.

आनंद महिंद्राच्या या प्रश्नावर नेटकरी देखील दोन गटात विभागले गेले. यावर एका युजरने लिहिले की, व्हिलचेअर हा भारतीयांद्वारे करण्यात आलेला आणखी एक घोटाळा आहे. तर एका युजरने लिहिले की, ज्यांची मुलं भारतात राहतात अशा परदेशात राहणाऱ्या आई-वडिलांसाठी व्हिलचेअर सहाय्यता एक वरदान आहे.

काहींनी आपल्या देशात ‘मानसिक विकलांग लोक’ असल्याचे देखील म्हटले.

Leave a Comment