व्यभिचाराविरोधी कायदा बनवणाऱ्यालाच पडले 28 चाबकाचे फटके


जकार्ता – इंडोनेशियातील सुमात्रामध्ये मुखलिस बिन मुहम्मद नावाच्या व्यक्तीला सर्वांच्या देखत 28 फटके मारण्यात आले आहेत. मुखलिसवर विवाहित महिलेशी अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. इंडोनेशियात तो व्यभिचार मानला जातो. मुखालिससोबत पकडलेल्या महिलेलादेखील वेताच्या छडीने 23 फटके मारण्यात आले.

मोठी गोष्ट म्हणजे एकेह उलेमा कौन्सिलने (एमपीयू) हे कठोर नियम बनवले आहेत, मुखलिस त्याच कौन्सिलशी संबंधित आहे. मुखालिसांनीच व्यभिचारकर्त्याविरूद्ध कठोर कायदा करण्यास मदत केली होती.

दरम्यान एकेह प्रांत पुराणमतवादी मानला जातो. येथे कठोर इस्लामिक कायदे लागू आहेत. मुखालिस या भागातील आहेत. प्रांतात जुगार, समलैंगिक संबंधांबद्दल कठोर शिक्षा देखील दिली जाते. एकेहचे उपमहापौर हुसेनी वहाब यांचे म्हणणे आहे की हे अल्लाहने बनविलेले नियम आहेत, जो कोणी तोडेल त्याला शिक्षा होईल. भले तो उलेमा परिषदेच्या सदस्या का असेनात.

वृत्तानुसार, या जोडप्याला पोलिसांनी समुद्रकिनार्‍याजवळ पार्क केलेल्या गाडीत पकडले होते. गुरुवारी ही शिक्षा देण्यात आली. वहाब म्हणाले की, मुखलिस यांना तातडीने कौन्सिलमधून काढून टाकण्यात आले. 46 वर्षांचे मुखलिस धार्मिक शिक्षक देखील आहेत. पण 2005मध्ये शरिया कायदा अस्तित्त्वात आल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी फटके मारण्याची शिक्षा सुनावण्यात आलेले हे पहिलेच धार्मिक शिक्षक आहेत. कठोर इस्लामिक कायदा लागू करण्यासाठी एकेह प्रांतास विशेष सवलत देण्यात आली आहे.

Leave a Comment