इटलीच्या गोल्डन सेंड पुरस्कारासाठी सुदर्शन पटनायक यांची निवड


नवी दिल्ली – कलाकार सुदर्शन पटनायक यांची इटालियन गोल्डन सेंड अवॉर्ड -2018 साठी निवड झाली आहे. इटलीमध्ये 13 ते 18 नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्कोरुना सेंड नेटिव्हिटी फेस्ट दरम्यान त्यांना हा सन्मान देण्यात येईल.

या कार्यक्रमात वाळूपासून आठ कलाकृति निर्माण करणारे कलाकार सादर केले जातील. प्रोमोवी स्कोर्नाचे अध्यक्ष विटो मारॅचिओ यांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी सुदर्शन यांना निमंत्रण पाठवले आहे. सुदर्शन म्हणाले, या कार्यक्रमाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो.

2014 मध्ये पटनायक यांना देशाचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 2017 मध्ये, पटनाईक यांनी रशियाची राजधानी मॉस्को येथे आयोजित 10 व्या वर्ल्ड सेंड स्कल्पचर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यांनी जगभरात आयोजित 60 पेक्षा जास्त वाळू कला स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

Leave a Comment