हरयाणा पोलिसांना झटका, न्यायालयाने हटवले हनिप्रीतवरील देशद्रोहाचे कलम


पंचकुला – डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम यांच्या मर्जीतील व्यक्ती असलेल्या हनिप्रीत इंसाला न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. गुरमीतची दत्तक मुलगी हनिप्रीत यांच्यावर पोलिसांनी लादलेल्या देशद्रोहाच्या कलमांना शनिवारी पंचकुला न्यायालयाने हटवले. यामुळे हरियाणा पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. हनिप्रीतवर ऑगस्ट 2017 मध्ये गुरमीत राम रहीम याला साध्वींसोबत लैंगिक अत्याचार प्रकरणी दोषी ठरवल्यानंतर पंचकुला हिंसाचार प्रकरणात देशद्रोह यासह अनेक कलमांतर्गत दोषी ठरविण्यात आले होते. हनीप्रीत या प्रकरणात मुख्य आरोपी आहे.

अंबाला येथील मध्यवर्ती कारागृहातून हनीप्रीत शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंचकुलाच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर झाली. सुनावणी दरम्यान अतिरिक्त सत्र न्यायाधीश संजय संधीर यांच्या न्यायालयाने हरयाणा पोलिसांनी 25 ऑगस्ट 2017 रोजी पंचकुलातील हिंसाचाराप्रकरणी मुख्य आरोपी हनीप्रीतवर लावलेले देशद्रोहाचे कलम दूर केले. या प्रकरणातील युक्तीवादानंतर हे आरोप निश्चित करण्यात आले.

न्यायालयाने हनीप्रीतसह सर्व आरोपींविरूद्ध देशद्रोहाचे कलम एफआयआर क्रमांक 345 वरून काढण्याचे आदेश दिले. न्यायालयाने हनीप्रीत आणि अन्य आरोपींविरोधात आयपीसीच्या कलम 121 आणि 121 ए काढून टाकले आहे. अशाप्रकारे आता या लोकांवर कलम 216,145,150, 151, 152 ए 153 आणि 120 बी अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत.

Leave a Comment