तुम्हाला माहिती आहे का डॉक्टरच्या चिठ्ठीवरील ‘Rx’चा अर्थ ?


मुंबई – कधी ना कधी आपण सर्वचजण आजारी पडतो आणि आपल्याला त्यामुळे डॉक्टरांकडे जावेच लागते. आपल्या शरीराची तपासणी केल्यानंतर डॉक्टर गोळ्या-औषध देतात. तसेच सोबत एक प्रिस्किप्शनही देतात. या प्रिस्किप्शनवर कुठले औषध लिहिले आहे हे मेडिकल स्टोअर्स वाल्यांशिवाय इतरांना कळत नाही. याच प्रिस्किप्शनवर डॉक्टर Rx असेही लिहितात. पण Rx असे का लिहितात आणि त्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? पण Rx असे प्रिस्किप्शनवर का लिहितात आणि त्याचा अर्थ काय आहे आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत

Rx हे एक लॅटीन भाषेमध्ये चिन्ह आहे इंग्रजीमध्ये ज्याचा अर्थ Take होतो. म्हणजेच याचा अर्थ ‘घेणे’ असा होतो. सामान्य माणसांनाच नाहीतर काही डॉक्टरही या शब्दाचा अर्थ सांगू शकणार नाहीत. Rx का लिहितात याच्या मागेही एक गोष्ट आहे, जी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, इजिप्तचे चिकित्सा क्षेत्रात मोठे योगदान राहीले आहे. होरस हि इजिप्त या देशाची एक देवता आहे. Rx सारखे होरस या देवताचे डोळे दिसतात. देवताची डोळे स्वास्थ जिवनाचे प्रतिक मानले जात असल्यामुळेच डॉक्टर आपल्या प्रिस्किप्शनवर Rx असे लिहितात. पण अनेकांना याच्याबद्दल माहिती नाही.

इजिप्त देशामध्ये औषधांच्या रुपात गोळ्या घेतल्या जात असत. त्यावेळी ८व्या शतकात पहिला दवाखाना बगदादमध्ये सुरु झाला होता. तर, अमेरिकेत पहिला दवाखाना १७व्या शतकात सुरु झाला होता. १८२१मध्ये अमेरिकेत जगातील पहिले फार्मसी कॉलेज सुरु झाले होते.

Leave a Comment