सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटाने यंदाच्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये स्थान पटकावले आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करून नंतरही बरेच विक्रम आपल्या नावी केले होते. सलमान खान आणि दिशा पटणीची जोडी या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत दिशाने पहिल्यांदाच स्क्रिन शेअर केली होती. सलमान खानसोबत आता पुन्हा एकदा तिची वर्णी लागली असल्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र पाहता येणार आहे.
पुन्हा एकदा सलमानसोबत स्क्रिन शेअर करणार पटणी
या चित्रपटाचे नाव ‘राधे’ असे असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभू देवा करत आहेत. सलमान खानचा हा प्रभू देवासोबतचा तिसरा चित्रपट आहे. प्रभू देवा यांच्या दिग्दर्शनाखाली यापूर्वी तयार झालेल्या ‘वॉन्टेड’ आणि आता लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘दबंग ३’ मध्ये सलमानने भूमिका साकारल्या आहेत. आता तो ‘राधे’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रभू देवासोबत काम करणार आहे.
And the journey begins . . .#RadheEid2020 @SohailKhan @bindasbhidu @DishPatani @RandeepHooda @PDdancing @atulreellife @nikhilnamit @SKFilmsOfficial @reellifeprodn pic.twitter.com/rup4OZFr2I
— Chulbul Pandey (@BeingSalmanKhan) November 1, 2019
२००३ साली सलमान खानचा प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’ या चित्रपटातील हे ‘राधे’ नावाचे पात्र होते. ‘वॉन्टेड’ मध्येही त्याचे नाव ‘राधे’ असेच होते. पण आता ‘राधे’ असे शिर्षक असलेला चित्रपटच तयार होणार असल्याने फार उत्सुक असल्याचे सलमानने सांगितले आहे. ‘वॉन्टेड’चाही ‘राधे’ हा बाप असेल, असेही तो म्हणाला.
या चित्रपटाच्या टीमचा फोटो सलमानने शेअर केला आहे. सलमान खानसोबत या फोटोमध्ये अतुल अग्निहोत्री, प्रभू देवा, सोहेल खान, दिशा पटणी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा यांची झलक पाहायला मिळते. सलमान खानसोबत ‘सुलतान’ आणि ‘किक’ चित्रपटात रणदीपने भूमिका साकारली होती. तर, ‘भारत’मध्ये जॅकी श्रॉफ यांची झलक दिसली होती. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.