राजस्थानच्या विद्यार्थ्यीनीने 17 दिवसांत बनवले जगातील सर्वात मोठे चित्र


बीकानेर – शहरातील मेघा हर्षने जगातील सर्वात मोठी चित्र बनवल्याचा दावा केला आहे. लवकरच त्याची नोंद अधिकृतपणे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाऊ शकते. बीकानेर बॉईज स्कूलच्या आवारात 70 फूट लांब आणि 70 फूट रुंद पेंटिंग करण्यास मेघाला 17 दिवस लागले.

मेघा म्हणाली, हे चित्र बनवून आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमधील सर्वात मोठ्या चित्राचा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी हा विक्रम सायप्रसच्या अ‍ॅलेक्सच्या नावावर होता, ज्याने 59 बाय 59 फूटाचे चित्र काढले होते.

मेघा म्हणाली, या चित्रा विषय म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने स्थापन केलेले शाश्वत विकास लक्ष्य आहे. ज्यामध्ये हवामान बदल, जलसंधारण आणि महिला सुरक्षा यासारख्या विषयांचा समावेश आहे. देशभरात बर्‍याच ठिकाणी मेघाची चित्रे प्रदर्शित झाली असून तिला अनेक सुवर्णपदकेही मिळाली आहेत.

मेघाने हे चित्र रेखाटण्यास 16 ऑक्टोबरपासून बीकानेर बॉईज स्कूलमध्ये सुरूवात केली. सलग 17 दिवस दररोज 6 तास रेखांकन करून, तिने जगातील सर्वात मोठे चित्र रेखाटले आहे.

Leave a Comment