जगातील या विचित्र शिक्षा वाचून तुम्ही देखील व्हाल हैराण

गुन्हा केल्यास प्रत्येक आरोपीला शिक्षा मिळत असते. गुन्हा लहान असो अथवा मोठा प्रत्येकाला शिक्षा होत असते. मात्र विचार करा, गुन्हेगाराला जर त्याच्या कृत्यासाठी विचित्र शिक्षा देण्यास सुरूवात झाली तर ?  आज आम्ही तुम्हाला अशाच काही अजिबोगरीब शिक्षांबद्दल सांगणार आहोत.

(Source)

अमेरिकेच्या मिसौरी येथील डेव्हिड बेरी नावाच्या व्यक्तीने शेकडो हरणांची शिकार केली होती. 2018 मध्ये न्यायालयाने त्याला दोषी ठरवत एक वर्ष जेलमध्ये राहण्याबरोबरच महिन्याला कमीत कमी एकदा तरी डिझनीचे बाम्बी कार्टुन बघण्याची शिक्षा सुनावली होती.

(Source)

वर्ष 2003 मध्ये अमेरिकेच्या शिकागो येथील दोन मुलांनी ख्रिस्मसच्या रात्री चर्चमधून येशूची मुर्ती चोरी केली होती आणि नुकसान पोहचवले होते. या प्रकरणात न्यायालयाने त्यांना 45 दिवस जेलमध्ये राहण्याची शिक्षा दिली होती व त्याचबरोबर गाढवाबरोबर त्यांची धिंड काढण्यात आली.

(Source)

अमेरिकेच्या ओकलाहोमामध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय टायलर एलरेडने दारू पिवून गाडी चालवल्याने झालेल्या दुर्घटनेत त्याच्या मित्राचा मृत्यू झाला होता. टायलर त्यावेळी शालेत शिकत असल्याने न्यायालयाने त्याचे शिक्षण पुर्ण होईपर्यंत 1 वर्ष त्याला ड्रग्स, दारू आणि निकोटिन घेतले नाही ना याची टेस्ट करण्यास सांगितले, तसेच 10 वर्ष चर्चमध्ये जाण्याची शिक्षा देखील दिली.

(Source)

स्पेनमधील एंडालूसियामध्ये राहणाऱ्या 25 वर्षीय युवकाने आई-वडिलांनी त्याची पॉकिटमनी बंद केली म्हणून त्यांच्याविरोधात न्यायालयाने धाव घेतली. मात्र न्यायालयाने त्यालाच शिक्षा देत 30 दिवसात घर सोडण्यास सांगितले.

(Source)

2008 मध्ये अँड्र्यू वेक्टरवर आपल्या गाडीत जोरात गाणी ऐकत असल्याने 120 पाउंडचा दंड आकारण्यात आला होता. यावेळी तो गाडीत रॅप ऐकत होता. मात्र नंतर न्यायालयाने ही रक्कम कमी करून 30 पाउंड केली. मात्र वेक्टरला 20 तास बीथोवन, बाख आणि शोपेन यांचे शास्त्रीय संगीत ऐकण्याची शिक्षा दिली.

 

Leave a Comment