आइसलँडमधील 1 दशक जुन्या ‘त्या’ बर्गरला पाहण्यासाठी आजही होते गर्दी

आइसलँडमध्ये मॅकडॉनल्ड बंद होऊन 1 दशकांचा काळ लोटला आहे. मात्र येथे ठेवण्यात आलेल्या शेवटच्या बर्गरबद्दल आजही लोकांमध्ये उत्सुकता आहे. आज 1 दशकांच्या निमित्ताने काचेच्या बॉक्समध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेल्या बर्गर आणि फ्राइजचे लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात आले.

2009 मध्ये आइसलँडमध्ये आर्थिक संकटामुळे मॅकडॉनल्डने आपल्यी तिन्ही ब्रँच बंद केल्या होत्या. आइसलँड हा पश्चिमेकडील पहिला असा देश आहे, जेथे मॅकडॉनल्डची एक ब्रँच नाही.

31 ऑक्टोंबर 2009 ला मॅकडॉनल्ड बंद होणार असल्याचे समजताच हिज्रोतुर समॅर्सन या व्यक्तीने जतन करण्यासाठी बर्गर खरेदी केला होता. हा बर्गर आज 1 दशकानंतरही सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे.

सॅमर्सनने सांगितले की, मॅकडॉनल्ड बंद होणार आहे हे समजल्यावर मी शेवटची मील ऑर्डर केली. मी ऐकले होते की, मॅकडॉनल्ड कधीच खराब होत नाही, मला केवळ हे सत्य आहे का हे बघायचे होते.

त्यानी आधी बर्गर आणि फ्राइज आपल्या गॅरेजमध्ये ठेवले, त्यानंतर ते नॅशनल म्युझियम ऑफ आइसलँडला संवर्धनासाठी सोपवले. त्यानंतर हे फूड आइसलँडची राजधानी रेयजॅव्हिक येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आले व अखेर आता हे फूड स्नोट्रा हाउस या हॉटेलमध्ये काचेच्या बॉक्समध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

हॉटेलच्या मालकांनी सांगितले की, जगभरातून लोक केवळ हा बर्गर पाहण्यासाठी येतात. दररोज 4 लाख हिट्स येत असल्याचा दावा देखील हॉटेलने केला आहे.

Leave a Comment