650 जणांनी मानवी साखळी करून 1700 फूट लांब लायब्रेरीत पोहचवली पुस्तके

अमेरिकेच्या ओक्लाहोमा येथील नॉर्मन येथे 30 वर्ष जुनी पब्लिक सेंट्रल लायब्रेरी आपल्या जागेपासून 1700 फूट लांब स्थलांतरित होणार होती. मात्र कामगार मिळत नसल्याने हे काम अपुर्ण राहिले होते. अशावेळी 650 लोकांनी एकत्र येत अन्ड्यू पार्क येथे मानवी साखळी करून 2 तासात 5000 पुस्तके नवीन लायब्रेरीमध्ये पोहचवली.

या मानवी साखळीत लहान मुले देखील सहभागी झाली होती. एवढेच नाही तर नॉर्मन शहराच्या महापौर ब्रेया क्लार्क देखील पुस्तके सुरक्षित पोहचवण्यासाठी मानवी साखळीत सहभागी झाल्या. नवीन पब्लिक लायब्रेरीचे उद्घाटन 3 नोव्हेंबरला होणार आहे.

या मानवी साखळेत 8 वर्षांच्या मुलांपासून ते 54 वर्षांच्या वृध्दापर्यंत सर्वचजण सहभागी झाले होते. लायब्रेरीचे प्रवक्ते कीथ मर्कक्स म्हणाले की, नॉर्मनची लोकसंख्या जवळपास 1.23 लाख आहे. येथे अधिकतर लहान मुले आणि युवक आहे. लायब्रेरीचे ठिकाण बदलल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. त्यांना लायब्रेरीबद्दल माहिती मिळताच ते सर्वजण मदत करण्यासाठी आले.

 

Leave a Comment