डीटीएच ग्राहकांनो अशी पूर्ण करा केवायसी

एअरटेल डिजिटल टिव्ही, टाटा स्काय, डिश टिव्ही सोबतच सर्व डीटीएच युजर्सला आता केवायसी (नो योर कस्टमर्स) प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे. याबाबतची घोषणा टेलिकॉम रेग्युलेटरी ऑफ इंडियाने (ट्राय) केली असून, याबाबतची नियम देखील लागू केले आहेत.

सर्व डीटीएच सर्विस प्रोव्हाइडर्सला आपल्या स्बस्क्रायबर्सची ओळख निश्चित करावी लागेल. ट्रायने आपल्या नियमांमध्ये स्पष्ट केले आहे की, डीटीएच ऑपरेटर्सने युजर्सद्वारे भरण्यात आलेल्या कंज्यूमर एप्लिकेशन फॉर्ममध्ये (सीएएफ)  नमूद केलेल्या पत्त्यावरच कनेक्शन देण्यात यावे. याशिवाय डीटीएच ऑपरेटर्सचे रिप्रेजेंटेटिव्हस ग्राहकांच्या घरी जाऊन निश्चित करतील की, कनेक्शन योग्य ग्राहकांच्या घरीच लावण्यात आलेले आहे.

केवायसी प्रक्रिया –

केवायसी प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी नवीन कनेक्शन घेताना ग्राहकाने सीएएफ फॉर्ममध्ये नाव, पत्ता, फोन नंबर दिलेला असतो. ग्राहक डीटीएच ऑपरेटर्सच्या नंबरवर मेसेज पाठवून ओटीपी मिळवू शकतात व त्याद्वारे व्हेरिफिकेशन प्रक्रिया पुर्ण होईल. नवीन कनेक्शन घेताना योग्य मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे.

ग्राहकांकडे मोबाईल नंबर नसेल तर प्रोव्हाडर्स ग्राहकांचे ओळख पत्र घेतील. याशिवाय ज्या जुन्या ग्राहकांचा नंबर सर्विस प्रोव्हाइडर्सकडे रजिस्टर नाही, अशा ग्राहकांनी 2 वर्षांच्या आत नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

केवायसी प्रक्रिया पुर्ण न केल्यास सेट-टॉप बॉक्स बंद देखील केला जाऊ शकतो.

Leave a Comment