घराबाहेर असणाऱ्या ‘स्मार्ट नेम प्लेट’द्वारेच मिळणार पाणी-वीज बिलाची माहिती

देशभरातील 100 शहरांना स्मार्ट बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या शहरातील घरांसमोर आता स्मार्ट नेम प्लेट देखील लावण्यात येणार आहे. या नावाच्या पाटीवर घराच्या मालकाचे नाव आणि पत्त्याबरोबरच क्यूआर कोड देखील असेल. या क्यूआर कोडमध्ये घरातील सदस्य आणि टॅक्स संबंधी माहिती असेल. क्यूआर कोडला स्मार्ट सिटी कंपनीच्या मोबाईल अॅपद्वारे स्कॅन केल्यावर घराशी संबंधित सर्व माहिती मिळेल. दमन आणि दीवनंतर मध्यप्रदेशच्या उज्जैनमधील सव्वा लाख घराबाहेर स्मार्ट नेम प्लेट लावण्याचे काम सुरू झाले आहे.

कचरा जमा करण्यास येणाऱ्या गाडीचा चालक क्यूआर कोड स्कॅन करेल. याद्वारे कोणत्या घरातून कचरा घेतला आहे, याचा डेटा ऑनलाईन रेकॉर्ड होईल. याशिवाय प्रत्येक महिन्याला अॅपवर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर पाणी, वीजचे बील याची माहिती मिळेल.

या नावाच्या पाटीद्वारे संपत्ती कराची देखील माहिती मिळेल. स्मार्ट अॅपद्वारे बिल आणि टॅक्स पेमेंट ऑनलाईन करता येईल. एक्रेलिक शीटची अर्धा इंच जाड प्लेटची किंमत 500 रूपये आहे. सुरूवातीला ही स्मार्ट नावाची पाटी मोफत लावण्यात येईल.

Leave a Comment