खड्डे दाखवा आणि मुंबई महापालिकेकडून ५०० रुपये मिळवा


मुंबई – यापुढे कदाचित मुंबई महानगरपालिकेकडून रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार देणाऱ्या मुंबईकरांना ५०० रुपये बक्षीस म्हणून मिळणार आहेत. सर्वसामान्य मुंबईकरांची रस्त्यातील खड्डे आणि खड्ड्यातून जाणारे रस्ते ही मोठी डोकेदुखी आहे. अनेकांचे जीव या खड्ड्यांनी घेतले. मुंबईकर खड्ड्यांच्या समस्येमुळे हैराण आहेत. पालिकेने यावर उपाय म्हणून एक अ‍ॅप लाँच केले होते. नागरिक या अ‍ॅपच्या माध्यमातून रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार करू शकतात.

२४ तासांत खड्ड्याच्या तक्रारीचे निवारण झाले नाही तर तक्रारदारांना पालिका ५०० रुपये देणार आहे. पण हे खड्डे १ फूट लांब आणि तीन इंच खोले असले पाहिजे. रस्त्यातील सारे खड्डे ३१ ऑक्टोबरपर्यंत भरण्याचे आदेश पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानंतर ही नवी योजना नोव्हेंबर पासून लागू होणार असल्याची माहिती द टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. मुंबईतील खड्ड्य़ांचे निवारण हे प्राधान्याने व्हावे यासाठी हा नवा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Comment