थेट गार्डनमध्येच केली विमानाची पुनर्रचना, आता पार्टीसाठी देणार भाड्याने

विमानांची आवड असणाऱ्या एका व्यक्तीने आपल्या मित्राबरोबर मिळून आपल्या गार्डनमध्ये विमानाची पुर्नरचना केली आहे. क्रोएशियातील स्ट्रिमेक स्टबिकी येथील एका व्यक्तीने हे खास विमान पार्टीसाठी तयार केले असून, हे विमान पर्यटकाचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

50 वर्षीय रॉबर्ट सेडलर यांनी आपल्या मित्राबरोबर मिळून फॉकर-100 हे विमान दुरूस्त करून, त्याची पुर्नरचना केली आहे. जेणेकरून कार्यक्रम आणि पार्टीसाठी हे विमान भाड्याने देण्यात येईल.

या विमानासाठी रॉबर्टने किती पैसे दिले हे सांगितले नाही. मात्र त्याने सांगितले की, त्याचे लहानपणापासून स्वप्न होते की, त्याच्या पार्कमध्ये एक विमान असावे.

रॉबर्टने सांगितले की, घरापासून 340 किमी दूर असलेल्या ओसिजेक विमानतळावरून हे विमान घरातील गार्डनमध्ये आणणे सर्वात अवघड काम होते. हे विमान 28 मीटर रूंद आणि 34.5 मीटर लांब आहे. त्यामुळे विमानाचे पार्ट्स वेगवेगळे करून विमान आणावे लागले. यासाठी तब्बल 6 आठवडे गेले.

1991 मध्ये बनविण्यात आलेल्या या नेदरलँडच्या विमानाची निर्मिती 2014 मध्ये बंद करण्यात आली होती. या विमानातून 100 प्रवासी प्रवास करू शकतात. या विमानाचे उद्घाटन 8 मार्च रोजी सेडलरच्या 51 व्या वाढदिवस आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे.

 

Leave a Comment