तुम्ही पाहिला आहे का पागलपंतीच्या कलाकारांचा हॅलोविन लुक?


बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम, अर्शद वारसी, अनिल कपूर आणि पुलकित सम्राट ही तगडी स्टारकास्ट आगामी पागलपंती या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चार नवे पोस्टर रिलीज करण्यात आले आहेत. काल जगभरात हॅलोविन हा सण साजरा केला गेला. त्या पार्श्वभूमीवर ही अनोखी पोस्टर्स चर्चेचा विषय ठरली आहेत.


‘पागलपंती’ या चित्रपटात अरशद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, इलियाना डिक्रुझ, क्रिती खरबंदा, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला यांसारखी स्टारकास्ट मुख्य भूमिकेत आहे. कॉमेडी ड्रामा असलेल्या ‘पागलपंती’ चित्रपटाची उत्सुकता वाढत चालली आहे. यापूर्वीही या चित्रपटातील अनेक वेगळ्या लूकची पोस्टर्स रिलीज झाली होती.

जॉन बऱ्याच दिवसानंतर या चित्रपटाच्या निमित्ताने कॉमेडी चित्रपटात भूमिका साकारत आहे. तो ‘राज किशोर’ हे पात्र या चित्रपटात साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बज्मी हे करत आहेत. तर, या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, मंगत पाठक, अभिषेक पाठक यांनी केली आहे. लंडन आणि लीडस यांसारख्या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले आहे. मुंबईच्या काही भागांमध्येही हा चित्रपट शूट करण्यात आला आहे. २२ नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Leave a Comment