सुरक्षित व्यवहारासाठी ‘गुगल पे’चे खास सिक्युरिटी फीचर

पेमेंट वॉलेट ‘गुगल पे’ने आपल्या युजर्सच्या सुरक्षेचा विचार करत एक खास फीचर आणले आहे. या फीचरचे नाव सिक्युरिटी फीचर 2.100 व्हर्जन आहे. नवीन फीचरद्वारे युजर्स ऑनलाईन पेमेंट करताना फिंगरप्रिट अथवा फेस रिकॉग्नाइजेशनचा वापर करू शकतील. यामुळे पिन अथवा पासवर्ड टाकण्याची गरज राहणार नाही. सध्या हे फीचर केवळ अँड्राईड 10 युजर्ससाठी असून, भारतातील युजर्ससाठी हे फीचर अद्याप आलेले नाही.

याआधी युजर्स पेमेंट करताना पिनचा वापर करून पेमेंट करत असे. मात्र आ नवीन फीचरमुळे पेमेंट करणे अधिक सुरक्षित होईल. लवकरच हे फीचर भारतातील युजर्ससाठी देखील लाँच केले जाणार आहे.

या नवीन फीचरचा वापर करण्यासाठी युजर्सला सेडिंग मनी पर्यायावर जावे लागेल. त्यानंतर युजर्सला पिनच्या ऐवजी बायोमॅट्रिक सिक्युरिटी हा पर्याय निवडावा लागेल. या फीचरचा वापर केवळ ऑनलाइन पेमेंट करतानाचा करता येईल. एनएफसी पेमेंट्ससाठी याचा वापर करता येणार नाही.

 

Leave a Comment