ही कंपनी कॉल केल्यावर अकाउंटमध्ये जमा करणार पैसे - Majha Paper

ही कंपनी कॉल केल्यावर अकाउंटमध्ये जमा करणार पैसे

भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांसाठी जबरदस्त कॅशबॅक ऑफर आणली आहे. बीएसएनएलची ही आतापर्यंतची सर्वात मोठी ऑफर आहे. कारण या ऑफर अंतर्गत ग्राहकांना फोनवर बोलण्याचे पैसे मिळणार आहेत.

बीएसएनएलची ही कॅशबॅक ऑफर 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ बोलणाऱ्या ग्राहकांसाठीच आहे. या ऑफरनुसार, जर तुम्ही 5 मिनिटांपेक्षा अधिक वेळ फोनवर बोलत असाल तर तुम्हाला 6 पैसे प्रति मिनिटांच्या हिशोबाने कॅशबॅक मिळेल. विशेष म्हणजे ही ऑफर केवळ बीएसएनएल ब्रॉडबँड आणि बीएसएनएल एफटीटीएच स्बस्क्रायबर्ससाठीच आहे.

काही दिवसांपुर्वीच रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी प्रति मिनिटाला 6 पैसे  इंटर कनेक्टेड यूजेज चार्ज घेणार असल्याचे सांगितले आहे. यानंतर जिओचे सर्वच प्लॅन महागले आहेत. आता जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने आपला आतापर्यंतचा सर्वोत्तम प्लॅन आणला आहे.

 

Leave a Comment