हा आहे जगातील सर्वात मोठा आवाज असणारा पक्षी

अमेरिकेच्या संशोधकांनी पांढरा बेलबर्ड हा जगातील सर्वात मोठा आवाज असणारा पक्षी असल्याचा दावा केला आहे. मॅसेच्युसेट्स युनिवर्सिटीच्या संशोधकांनुसार, मेंटिगच्या वेळी या पक्ष्याचा आवाज हॉउलर माकडापेक्षाही अधिक असतो. बेलबर्ड जोरात आवाज करणाऱ्या फियाज नावाच्या पक्ष्यापेक्षाही तीन पट अधिक जोरात ओरडतो. पांढऱ्या बेलबर्ड आधी स्क्रीमिंग फियाजला जगातील सर्वाधिक मोठा आवाज असणारा पक्षी समजले जात असे. हा पक्षी 125 डेसिबल एवढा आवाज काढता. हा पक्षी खासकरून अॅमेझॉनच्या जंगलात आढळतो.

संशोधक जेफ पेडोसनुसार, मादी पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी नर पक्षी आपल्या आवाजाच्या सर्वात वरच्या स्तरापर्यंत पोहचतो. मादीला आकर्षित करण्यासाठी बेलबर्ड तिच्या भोवती फेऱ्या देखील मारतो. संशोधनात दिसले की, अनेकदा मादी पक्षी पांढऱ्या बेलबर्ड जवळ येऊन बसते.

जोरात ओरडणाऱ्या नर बेलबर्डच्या आवाजामुळे मादी पक्ष्याची ऐकण्याची क्षमता कमी होण्याची शक्यता असते. असे असले तरी मादी पक्षी नराला जवळ येऊ देते. पांढऱ्या बेलबर्डची आतील रचना वेगळी आहे. त्यांच्या पोटातील मांसपेशी आणि बरगडी अधिक मजबूत असते. हेच त्यांच्या मोठ्या आवाजाचे कारण आहे.

मोठा आवाज असल्याने हे पक्षी अधिक काळ गात नाही. ज्या प्रमाणे मोराला जोडीदार निवडण्यासाठी पंखाची भूमिका महत्त्वाची असते, त्याचप्रमाणे बेलबर्ड आवाजाद्वारे आपला जोडीदार निवडतो.

Leave a Comment