राजकीय जाहिरातींवर ट्विटरची बंदी

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने आपल्या प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिराती दाखवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती ट्विटरचे सीईओ जॅक डोर्सीने यांनी ट्विट करत दिली.

जॅक यांनी याबाबत माहिती दिली की, या प्रकारच्या जाहिराती खूपच प्रभावी होत्या व व्यावसायिक जाहिरातींवर याचा परिणाम होतो. लाखो लोकांवर या जाहिरातांची प्रभाव पडत असे.

सोशल मीडिया साइट फेसबुकने याआधी स्पष्ट केले होते, कंपनी राजकीय जाहिराती बंद करणार नाही. 2016 मध्ये अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर राजकीय जाहिराती चर्चेचा विषय ठरला होता.

ट्विटरने म्हटले आहे की, याबाबतची अंतिम पॉलिसी 15 नोव्हेंबरपर्यंत जारी होईल व हा निर्णय 22 नोव्हेंबरपासून लागू करण्यात येईल. हा नियम लागू करण्याआधी जाहिरातदारांना नोटिस पिरियड देखील मिळेल.

Leave a Comment