उद्यापासून बदलणाऱ्या बँकांच्या या नियमांचा तुमच्यावर होणार थेट परिणाम


नवी दिल्ली : उद्यापासून म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून बँकांच्या नियमात बदल होणार आहे. यामध्ये बँकांच्या कामाच्या वेळा, व्याजदरात बदल झाले आहेत. तुमच्या पैशांवर या नियमांचा थेट परिणाम होऊ शकतो. स्टेट बँक ऑफ इंडिया डिपॉझिटवरच्या व्याजदरात बदल करणार आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये सरकारी बँका उघडण्याची आणि बंद होण्याची वेळ देखील बदलणार आहे.

जर तुम्ही स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर डिपॉझिटवरचा व्याजदर 1 नोव्हेंबरपासून बदलणार आहे. याचा थेट परिणाम बँकेच्या 42 कोटी ग्राहकांवर होईल. आता 3.25 टक्के एक लाख रुपयांपर्यंतच्या डिपॉझिटचा व्याजदर करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील बँकांचे नवे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. आता एकाच वेळी सगळ्या बँका सुरू होतील आणि एकाच वेळी बंद होतील. सकाळी 9 ते दुपारी 4 अशी बँकांच्या कामाची वेळ करण्यात आली आहे. बँकांचे कामकाज याआधी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 अशी होती. पण पैशांचे व्यवहार मात्र दुपारी 3 पर्यंत चालायचे. त्याचबरोबर स्टेट बँकेच्या कर्जाचा व्याजदर 8.05 टक्के करण्यात आला आहे. 10 ऑक्टोबरपासून हे नवे दर लागू झाले आहेत. रेपो रेट रिझर्व्ह बँकेने कमी केल्यानंतर स्टेट बँकेने व्याजदरात कपात केली आहे.

Leave a Comment