अरेच्चा ! चक्क उंदराना देण्यात आले कार चालविण्याचे प्रशिक्षण

अमेरिकेच्या संशोधकांनी उंदराना जेवणाच्या जागी छोटी कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात यश मिळविले आहे. संशोधकांनुसार, उंदीर जेव्हा नवीन काही शिकतात तेव्हा त्यांच्या तणावाचा स्तर घटतो. अमेरिकेतील रिचमॉन्ड युनिवर्सिटीने या अभ्यास केला आहे. या रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, उंदरांचा मेंदू खूपच संवेदनशील असतो आणि त्यांच्या मदतीने भविष्यात विना औषधांचे आजारांवरील उपचार शोधण्यासाठी मदत होईल.

संशोधक लॅम्बर्ट यांच्यानुसार, प्रयोगद्वारे हे स्पष्ट झाले की, नवीन आव्हान आणि नवीन अनुभव घेतल्यानंतर मेंदूमध्ये बदल घडतात. उंदीर त्यांच्या घरात आणि लॅबमध्ये राहिल्यावर कसे वागतात, याचा देखील अभ्यास करण्यात आला.

(Source)

लॅम्बर्ट यांच्या टीमने रोबॉट कार किट तयार केली आहे. यामध्ये ड्रायव्हर कंपार्टमेंटच्या जागी फूड कंटेनर लावण्यात आले आहे. त्याच्या खाली एल्यूमिनियची प्लेट आहे. याशिवाय यात कॉपर वायर देखील लावण्यात आली असून, त्याद्वारे कार दिशा बदलते.

कारच्या एल्यूमिनियम प्लेटवर उंदराला ठेवण्यात आल्यानंतर, तो वायरला स्पर्श करतो. सर्किट पुर्ण होताच कार सुरू होते आणि उंदीर जी दिशा निवडतात, त्या दिशेला कार जाते. यावेळी संशोधनात 16 उंदराना अनेक महिने प्रशिक्षण देण्यात आले.

बिहेवियरल ब्रेन रिसर्चमध्ये प्रकाशित संशोधनानुसार, प्रयोगानंतर उंदरांची विष्ठा तपासण्यात आली. यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉन आणि डीहाइड्रोपियनस्टेरॉन सारख्या स्ट्रेस हॉर्मोनचा स्तर कमी आढळला. जेव्हा प्रशिक्षणासाठी त्यांना तयार करण्यात येत होते, त्यावेळी त्यांच्या स्ट्रेस हॉर्मोनचा स्तर अधिक होता.

 

Leave a Comment